ख्रिसमस: यांना जंगलातच सण का साजरा करावा लागतोय?

ख्रिसमस: यांना जंगलातच सण का साजरा करावा लागतोय?

जगभरात ख्रिसमसचा सण आनंदात साजरा केला जात असला तरी इंडोनेशियातल्या ख्रिश्चन बांधवांना मात्र हा सण जंगलात जाऊन साजरा करण्याची वेळी आलीय.

4 वर्षांपूर्वी इस्लामिक कट्टरवादी आणि स्थानिक पोलिसांनी त्यांच्या चर्चच्या इमारती पाडल्या आहेत. संपूर्ण इंडोनेशियामध्ये केवळ 'आचे' या एकाच प्रदेशात असा इस्लामिक कायदा लागू झाला आहे ज्यानुसार चर्च बांधण्यासाठी किमान 100 बिगर ख्रिस्ती लोकांचा पाठिंबा आवश्यक आहे. ख्रिस्ती नेते म्हणतात असं होणं अशक्य आहे.

इथल्या महापौरांनी या इस्लामिक कायद्याची पाठराखण केली आहे.

त्यामुळं यंदाचा ख्रिसमस सण इथल्या लोकांना जंगलात साजरा करण्याची वेळ आलीय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)