महिलांना स्वयंपूर्ण बनवणारी दुग्धक्रांती

महिलांना स्वयंपूर्ण बनवणारी दुग्धक्रांती

फक्त महिलांचा सहभाग असलेला देशातला हा सगळ्यांत मोठा सहकारी दूध संघ आहे.

आज 70 हजाराहून अधिक महिला या संघाच्या सदस्य आहेत. या दुधसंघाच्या शेअर होल्डर्सला यातून चांगले पैसे मिळतात.

दुध विकणाऱ्या महिलाच या दूध संघाच्या संचालक आणि अध्यक्ष बनतात. श्रीजामध्ये दररोज 4.5 लाख लीटर दुधाचं संकलन होतं.

हा दूध संघ चारा, जनावरांसाठी औषधं तसंच विमा आणि दुधाची ने-आण करायच्या वाहनांसाठी महिलांना अनुदान देतो. या दूध संघाची उलाढाल 400 कोटींवर पोहचली आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)