बापलेकीचा ‘हा’ व्हीडिओ ठरतोय कौतुकाचा विषय
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

बापलेकीचा ‘हा’ व्हीडिओ ठरतोय कौतुकाचा विषय - पाहा व्हीडिओ

कोल्हापूरच्या उखळू गावाचे नागेश पाटील यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

त्यात त्यांनी लेक निहारिकाच्या पावलांचे ठसे उमटवून गाडीचं स्वागत केलं होतं.

"मी आयुष्यात जे काही मोठं काम करेन, त्याची सुरुवात माझ्या मुलीच्या स्पर्शानं व्हावी, अशी माझी पहिल्यापासून इच्छा होती. मी जेव्हा गाडी घेतली, तेव्हा तिची पूजा मुलीच्या पावलांनी केली," असं करण्यामागचं कारण ते सांगतात.

"मुलगी लक्ष्मी असते, सगळ्यांनीच तिचा आदर करावा," असं ते पुढे सांगतात.

कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या या व्हीडिओची दखल घेत शुभेच्छा दिल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)