अॅसिड हल्ल्यापासून स्वतःला कसं वाचवाल ?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

Chhapak: अॅसिड हल्ल्यापासून स्वतःला कसं वाचवाल?

हा गुजरातमधला सेल्फ डिफेन्स क्लास आहे. नवसारी शहरात या मुलींना शिक्षणाबरोबरच स्वसंरक्षणाचे धडेही दिले जातात.

इथे अॅसिड हल्ला छेडछाड, शारीरिक हल्ला आणि कारमधून कोणी पळवून नेत असेल तर बचाव कसा करायचा हेही शिकवतात.

इथले प्रशिक्षक विल्पी कासर सांगतात, "नकोशा स्पर्शाला विरोध करायचा असेल तर पेन्सिल हल्ला, केस ओढणं, रेप डिफेन्समध्ये खाली पाडणं, अॅसिड हल्ल्यापासून स्वतःला वाचवणं हे सगळं आम्ही शिकवतो. तसंच रिक्षा किंवा कॅब ड्रायव्हर तुम्हाला भलत्याच ठिकाणी घेऊन जात असेल तर कसं वाचाल? तुम्ही त्याचे केस ओढू शकता, ओढणीने गळा दाबू शकता. मला मुलींना हेच सांगयचंय की बोला, विरोध करा."

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)