बुट घ्यायला पैसे नव्हते, आज भारतीय टीमची मिड-फिल्डर आहे
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

एकेकाळी बुट घ्यायला पैसे नव्हते, आज भारतीय हॉकी टीममध्ये आहे

सोनिपतची नेहा गोयल भारतीय महिला हॉकी टीममध्ये मिड-फिल्डर आहे. नेहा शाळेत असल्यापासून हॉकी खेळतेय.

नेहा फक्त 23 वर्षांची आहे. 2017मध्ये दीर्घ आजारपणानंतर तिच्या वडिलांचं निधन झालं.

घर चालवण्यासाठी तिची आई लेदर आणि सायकलींच्या फॅक्टरीत काम करायची.

"मी पेपरमध्ये येणारी महिला खेळाडूंची नाव वाचली होती. माझ्या मैत्रिणीने मलाही विचारलं खेळशील का? मला मोह आवरला नाही कारण तिने सांगितलं की चांगले कपडे, बुट आणि इतर गोष्टी मिळतील. तेव्हा माझ्याकडे यापैकी काही नव्हतं," नेहा सांगते.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)