91 वर्षांच्या आजी झाल्यात शिक्षिका, निवृत्त होतात त्या वयात स्वीकारली नोकरी

बंगळुरुच्या 91 वर्षांच्या लक्ष्मी कल्याणसुंदरम् शिक्षिका आहेत. 14 व्या वर्षी लग्न झाल्यानंतर त्या संसारातच गुंतून पडल्या.

साठीनंतर त्या विशेष मुलांच्या शाळेत शिकवायला लागल्या. त्या 67 वर्षांच्या असताना त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. इतर लोक निवृत्त होतात त्या वयात त्यांनी शिक्षिकेची नोकरी स्वीकारली.

"माझी खूप इच्छा होती डॉक्टर बनायची. मला आजारी लोकांची सेवा करायची होती. पण तेव्हा महिलांना काही अधिकार नव्हते. पण आता माझं निदान अर्धं स्वप्न तरी पूर्ण होतंय. या मुलांना कोणी नाहीये आणि मी त्यांची काळजी घेतेय."

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर