Rakesh Maria Book: शीना बोरा खून तपासाला राकेश मारियांच्या नवीन पुस्तकामुळे नवं वळण

Rakesh Maria Book: शीना बोरा खून तपासाला राकेश मारियांच्या नवीन पुस्तकामुळे नवं वळण

जवळपास साडेचार वर्षांपूर्वीचं शीना बोरा हत्या प्रकरण तुम्हाला आठवत असेलच? मीडिया क्षेत्रातील उद्योगपती इंद्राणी मुखर्जी आणि तिचे पती पीटर मुखर्जी यांच्यावर त्यांची मुलगी शीना बोरा हिचा खून केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात अख्ख्या मीडियाचं लक्ष वेधणारा तपास करणारे मुंबर्ईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती.

राकेश मारिया यांची बदली ही पदोन्नती होती की शिक्षा, अशी चर्चा तेव्हा गाजत होती. या प्रकरणात प्रथमच राकेश मारिया यांनी आपली बाजू जगापुढे मांडली आहे, त्यांच्या आत्ताच आलेल्या 'Let me Say it Now' या पुस्तकातून.

काय म्हणतायत ते? आणि त्यामुळे शीना बोरा हत्याकांड पुन्हा चर्चेत का आलं? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर

शूटिंग आणि एडिटिंग – निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)