NPR मुळे उद्धव ठाकरे – शरद पवार यांच्यातला तणाव वाढतोय?

NPR मुळे उद्धव ठाकरे – शरद पवार यांच्यातला तणाव वाढतोय?

महाविकास आघाडी सरकारमधले वादाचे विषय वाढतच चालले आहेत. आधीच एल्गार परिषदेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात जाहीर मतभेद झाले असताना आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तो वाद आहे NPRचा.

महाराष्ट्रात जनगणनेसोबत NPR होणार की नाही? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात होणार, पण काँग्रेसने स्पष्ट विरोध केलाय तर राष्ट्रवादीने सूचक भूमिका घेतलीये. पण त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्याबद्दल आता दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्या आहेत.

काय आहे हे NPR प्रकरण? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर

निर्मिती – निलेश भोसले

याविषयी अधिक इथे वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)