मी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची मुलगी बोलतेय...

मी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची मुलगी बोलतेय...

"माझं नाव उज्ज्वला जनार्दन उइके. यवतमाळ जिल्ह्यात जरूर नावाचं माझं छोटसं गाव आहे."

"एरवी कोणाचं लक्षही जाणार नाही या गावाकडे, पण याच गावाचं नाव पेपरमध्ये आलं पुन्हा पुन्हा, चॅनलवर दिसलं, मोठे मोठे पुढारी येऊन गेले इथे, अनेकांनी या गावातल्या समस्येवर चर्चासत्र भरवली. कारण? या गावातल्या एका घरातल्या तीन शेतकऱ्यांनी एका पाठोपाठ एक आत्महत्या केल्या. ते घर माझं होतं."

शेतकरी बाप आत्महत्या करतो तेव्हा लेकीला याची चाहुल लागलेली असते का? तिच्या मनात काय काहूर माजलेलं असतं? वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर तिला काय वाटतं? याची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न.

(व्हीडिओ : अनघा पाठक, नितेश राऊत, अरविंद पारेकर)

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)