MahaPortal: महापरीक्षा महापोर्टल अखेर बंद – चांगलं की वाईट?

MahaPortal: महापरीक्षा महापोर्टल अखेर बंद – चांगलं की वाईट?

महाराष्ट्र सरकारच्या प्रशासकीय विभागांमधल्या Class 3 आणि 4 च्या नोकऱ्यांसाठी फडणवीस सरकारने आणलेलं महापरीक्षा पोर्टल बंद पाडण्याचा निर्णय अखेर उद्धव ठाकरे सरकारने घेतलाय.

2017 साली फडणवीस सरकारने सुरू केलेलं हे पोर्टल वादाच्या भोवऱ्यात का सापडलं? आणि ते बंद केल्याने खरंच परीक्षार्थींचं काही भलं होणार आहे का?

मुळात हे महापोर्टल आलं कुठून आणि कशासाठी? त्याच्या तक्रारी घेऊन लोकांनी चक्क मोर्चे का काढावे लागले? त्यामुळे कुणाचा फायदा झाला आणि कुणाकुणाचं नुकसान? आणि आता यापुढे महाराष्ट्र शासनाच्या नोकरीसाठी कुठे जावं लागणार?

हा एकूणच विषय समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर

निर्मिती – निलेश भोसले

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)