केनियातली रंगीबेरंगी मण्यांचे दागिनेच दागिने

केनियातली रंगीबेरंगी मण्यांचे दागिनेच दागिने

केनियातले मूळ रहिवासी त्यांच्या मण्यांच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहेत. या मण्यांचे रंग, आकार आणि दागिन्यांचे डिझाइन्स त्या त्या जमातीनुसार ठरतात.

आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळे दागिने घालायची पद्धत मसाई आणि संभरु जमातींमध्ये होती .

हे मणी पूर्वी शहामृगाच्या अंड्यांचं कवच, प्राण्यांची हाडं, फळांच्या बिया, स्फटिक, रंगीत दगड, हस्तिदंत, सोनं किंवा चांदीपासून बनत.

या दागिन्यांना धार्मिक महत्त्वंही आहे. वय वाढेल तसे या दागिन्यामधील मणी बदलतात.

व्हीडिओ - अनघा पाठक, बीबीसी मराठी प्रतिनिधी

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)