कोरोना व्हायरस: लस तयार होण्यासाठी आणखी किती वेळ लागेल?- सोपी गोष्ट

कोरोना व्हायरस महाराष्ट्रात वेगाने पसरतोय आणि आता मुंबईत मृत्यूही झाला आहे. जगभरात तर साडेसहा हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. कोरोना विषाणूवर लस शोधण्याचे प्रयत्न जगभर होताना दिसत आहे.

2019च्या डिसेंबर महिन्यात चीनमधल्या वुहान शहरात न्युमोनियामुळे अचानक लोकांचे मृत्यू होत असल्याचं पुढे आलं. याचं कारण ठाऊक नव्हतं म्हणून जानेवारी 2020मध्ये चौकशी सुरू झाली आणि हा व्हायरस नवा असल्याचं लक्षात आलं. आता मार्च महिना सुरू आहे. म्हणजे हा रोग प्राण्यांमधून माणसांमध्ये शिरून साधारणतः 3 महिने झाले आहेत.

कोरोना व्हायरसवर उपचारासाठी औषध किंवा लस केव्हा तयार होईल?, असा प्रश्न तेव्हा सोशल मीडियावर विचारला जात आहे.

या व्हायरसची बाधा जगातल्या 100 पेक्षा जास्त देशांतल्या दीड लाखांहून जास्त लोकांना झाली आहे. जगभरात साडेसहा हजारहून अधिक लोकांचे जीव गेले आहेत.

हे सगळं होत असताना कोरोनाची लस शोधण्याचं काम अतिशय वेगाने जगात अनेक ठिकाणी सुरू आहे.

पण कोरोना व्हायरसची लस तयार होण्यासाठी आणखी किती वेळ लागेल? पाहूया आजच्या 'सोपी गोष्ट'मधून.

#CoronaVirus #Covid19 #कोरोनाव्हायरस #सोपीगोष्ट

व्हीडिओ - विनायक गायकवाड

संहिता - तुषार कुलकर्णी

शूट-एडिट - निलेश भोसले

कोरोना व्हायरस महाराष्ट्रात वेगाने पसरतोय आणि आता मुंबईत मृत्यूही झाला आहे. जगभरात तर साडेसहा हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. कोरोना विषाणूवर लस शोधण्याचे प्रयत्न जगभर होताना दिसत आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)