उन्हाळा आला तर कोरोना व्हायरसचा प्रसार आपोआप थांबणार का?

कोरोना व्हायरसविरुद्ध युद्ध सुरू झालंय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. पण ज्याच्याविरुद्ध हे युद्ध सगळ्या जगान पुकारलंय तो कोरोना व्हायरस उन्हाळा सुरू झाल्यावर आपोआप नष्ट होईल का?

उन्हाळा आला की आपोआपच कोरोना व्हायरसचा प्रसार थांबेल अशी आशा लोकांना आहे पण या व्हायरसचा प्रसार थांबवायचा असेल तर कडक उपाय योजना कराव्या लागतील असं तज्ज्ञांचं मत आहे.

कोरोना व्हायरस नष्ट कसा होतो हे पाहण्याआधी आपण बघू या व्हायरसचा प्रसार कसा होतो. कोरोना व्हायरस हा लिक्विड ड्रॉपलेट म्हणजे सूक्ष्म थेंबांमधून पसरतो. एखादी कोरोनाबाधित व्यक्ती शिंकली किंवा खोकली तर त्यातून एका वेळेला किमान 3000 असे अतिशय छोटे शिंतोडे तोंडातून बाहेर पडतात. या शिंतोड्यांमध्ये कोट्यवधी कोरोना व्हायरस प्रोटीनच्या आवरणांमध्ये सुरक्षित असतात.

#CoronaVirus #Covid19 #कोरोनाव्हायरस #सोपीगोष्ट

व्हीडिओ - विनायक गायकवाड

संहिता - तुषार कुलकर्णी

शूट-एडिट - निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)