हंता व्हायरस कुठून आला? भारतीयांना यापासून धोका आहे का? - सोपी गोष्ट

जगभरात कोरोना व्हायरसमुळे लाखो लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत अनेक देश संपूर्ण सध्या लॉकडाऊनमध्ये आहे.

त्यातच मंगळवारी आणखी एका व्हायरसचं नाव सोशल मीडियावर, बातम्यांमधून चर्चेत येऊ लागलं - हंता व्हायरस.

मेरिकेच्या सेंटर फॉर डिसीजच्या रिपोर्टनुसार हंता व्हायरस हा उंदरांमुळे पसरतो. जर कुणाचा उंदराच्या विष्ठा, लाळेशी संपर्क आला आणि त्यानंतर त्या व्यक्तीने तोच हात आपल्या चेहऱ्याला लावला तर त्याला या व्हायरसची बाधा होऊ शकते.

या व्हायरसचं संक्रमण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. एखाद्या व्यक्तीलाहंताची बाधा झाली आहे की नाही हे कळण्यासाठी एक ते आठ आठवड्याचा वेळ लागतो.

व्हिडिओ - विनायक गायकवाड

निर्मिती - तुषार कुलकर्णी

एडिटिंग - शरद बढे

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)