कोरोना व्हायरसः एकाच व्हेंटिलेटरमधून चार जणांना एकाचवेळी ऑक्सिजन

कोरोना व्हायरसः एकाच व्हेंटिलेटरमधून चार जणांना एकाचवेळी ऑक्सिजन

काश्मीरमध्ये कोरोना व्हायरसशी सामना करताना आरोग्यविषयक सेवा सुविधांचा तुटवडा भासतो आहे. व्हेंटिलेटर्स हे कोरोनाविरोधातल्या लढाईतलं मुख्य शस्त्र आहे.

पण, तिथे फक्त दोनशे व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. यावर मात करण्यासाठी तिथल्या तरुण तंत्रज्ञांनी जागतिक संशोधनाचा आधार घेत अनोखी शक्कल लढवली आहे. एक व्हेंटिलेटर चार जणांना एकाचवेळी ऑक्सिजन पुरवेल अशी सोय त्यांनी केली आहे. या तंत्रज्ञानाविषयीचा बीबीसी प्रतिनिधी आमीर पिरझादा यांचा हा रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)