रोहिंग्या निर्वासित ज्यांना मलेशियात बोटीतून जाताना जीव गमवावा लागला

रोहिंग्या निर्वासित ज्यांना मलेशियात बोटीतून जाताना जीव गमवावा लागला

बांग्लादेश आणि मलेशिया दरम्यान बोटीवर अडकलेल्या शेकडो रोहिंग्या निर्वासितांकडे लक्ष द्यावं असं आवाहन संयुक्त राष्ट्रांनी केलंय. तीन वर्ष हे लोक बांग्लादेशच्या निर्वासित छावण्यांमध्ये राहात होते. पण तिथून पलायन करत ते मलेशियामध्ये अवैध मार्गाने प्रवेश करणार होते.

कोरोनाचा संसर्ग होईल या भीतीने त्यांना तिथे प्रवेश नाकारण्यात आला. तस्करी करणाऱ्या बोटींमधून प्रवास करणाऱ्या काही रोहिंग्यांना बांग्लादेशात परतावं लागलं. या व्हिडिओतील काही दृश्यं तुम्हाला विचलित करू शकतात. बीबीसीच्या प्रतिनिधी रजनी वैद्यनाथन यांचा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)