कोरोना व्हायरस : प्यायला पाणी नाही, तर हाथ धुवायला कुठून आणू?

कोरोना व्हायरस : प्यायला पाणी नाही, तर हाथ धुवायला कुठून आणू?

नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातलं बर्डेची वाडी गाव. दर उन्हाळ्यात इथे पाण्यासाठी वणवण नित्याचीच झालीये.

पाणीटंचाई पाचवीला पुजलेली भारतातली अनेक गावं कोरोनाच्या भीतीत जगत आहेत. पण सतत हात धुणं त्यांना परवडणारं नाही.

आपल्याला जास्ती पाणी मिळावं म्हणून महिला रात्री 2 वाजेपासून इथे गर्दी करतात. अशात सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही ते वेगळंच.

पाणी दुर्मिळ असलेल्या या भागात साबणही चैनच आहे. हात धुणं, भांडी घासणं यासाठी अजूनही मुख्यत्वेकरून राखच वापरली जाते.

इथल्या आसपासच्या गावांमध्ये एकही कोव्हिड-19चा रुग्ण आढळला नसला तरी आजारापेक्षा पाण्याचं संकट गावकऱ्यांसाठी मोठंय.

रिपोर्टर - अनघा पाठक

शूट - प्रवीण ठाकरे

एडिट - निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)