आत्मनिर्भर भारत अभियान: नरेंद्र मोदी यांची स्वदेशीची हाक कितपत शक्य? |सोपी गोष्ट 77

आत्मनिर्भर भारत अभियान: नरेंद्र मोदी यांची स्वदेशीची हाक कितपत शक्य? |सोपी गोष्ट 77

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’ची घोषणा केलीये. यासाठी त्यांनी २० लाख कोटींच्या एका पॅकेजचीही घोषणा केली. आत्मनिर्भर म्हणजेच स्वयंपूर्ण किंवा self reliant.

साध्या सरळ सोप्या भाषेत बोलायचं झालं तर आपल्या गरजा आपणच पूर्ण करायच्या, असा याचा अर्थ होतो. कोरोनाचं संकट हे अभूतपूर्व आहे आणि यातून आपल्याला वाचयचंय आणि पुढे जायचंय आणि यासाठी आत्मनिर्भर भारत हाच पर्याय असल्याचं मोदींनी म्हटलंय.

खरं तर भारतासाठी हा कॉन्सेप्ट काही नवा नाहीये. आपल्याला सगळ्यांना माहितीये की अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वदेशी हा शब्द आपण ऐकत आलोय.

गेल्या ६ वर्षांत मेक इन इंडिया हा मोदी सरकारचा उपक्रमही आपण पाहिलाय. मग आता कोरोनाच्या या जागतिक आरोग्य संकटाच्या तोंडावर मोदींनी स्वयंपूर्णतेची किंवा स्वावलंबनाची हाक का दिलीये? चीनच्या वुहानमधून सुरु झालेल्या कोरोनानं संपूर्ण जगाला कसं गिळंकृत केलंय आणि जागतिक अर्थव्यवस्थांना, जागतिकीकरणाला ब्रेक लावलाय... मग अशा परिस्थितीत आत्मनिर्भर भारत कितपत शक्य आहे? यातून काय साध्य होणार आहे? हे एक सुरस स्वप्न आहे की हे सत्यातही उतरू शकतं?

याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर, उद्योगधंद्यांवर आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे आपल्यावर नेमका काय परिणाम होईल? याचबद्दल आज आपण बोलणार आहोत. पाहूया आजची आपली सोपी गोष्ट मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेची...

संशोधन - गुलशनकुमार वनकर

निवेदन - विनायक गायकवाड

एडिटिंग - निलेश भोसले

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)