HCQ: WHOने कोरोना रुग्णांवर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची चाचणी करायला का घातली बंदी?

HCQ: WHOने कोरोना रुग्णांवर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची चाचणी करायला का घातली बंदी?

जागतिक आरोग्य संस्था कोव्हिडशी मुकाबला करण्यासाठी कोणतं औषध कामी येऊ शकेल यासाठी जगभरात विविध औषधांच्या चाचण्या करतेय. त्या चाचण्यांमधून त्यांनी आता HCQ वगळलंय. त्याची सेफ्टी असेसमेंट होत नाही तोपर्यंत.

पण भारतात अजूनही या गोळ्यांचा वापर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केला जातोय. HCQ च्या उपयुक्ततेबद्दल आतापर्यंत अनेक दावे केले गेले आहेत. अमेरिकेत ट्रंप यांनी आरोग्य प्रशासनाचा सल्ला धुडकावत स्वतः या गोळ्या घेत असल्याचं कबुल केल्यानंतर त्यांच्यावर टीकाही झाली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)