जॉर्ज फ्लॉईड: अमेरिकेत वर्णद्वेश विरोधी आंदोलनाचा भडका का उडालाय?

जॉर्ज फ्लॉईड: अमेरिकेत वर्णद्वेश विरोधी आंदोलनाचा भडका का उडालाय?

अमेरिकेत एका आफ्रो अमेरिकन व्यक्तीचा पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाला. आणि त्यानंतर अमेरिका भर पसरलेली आंदोलनं मागच्या सहा दिवसांत उग्र रुप धारण करत आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना व्हाईट हाऊसच्या बंकरमध्ये हलवण्यात आलंय.

आंदोलनं दिवस-रात्र सुरूच आहेत. दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला. दोषी पोलीस अधिकारी डेरेक शॉविन यांना आज कोर्टासमोर हजर करण्यात आलं. आता पुढची सुनावणी आठ जूनला होणार आहे.

आतापर्यत अमेरिकेत काय काय घडलंय यावर बीबीसी प्रतिनिधी डेव्हिड विलिस यांचा खास रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)