कोव्हिड-19 नंतरही अमेरिकेत वर्क फ्रॉम होम सुरूच राहणार?

कोव्हिड-19 नंतरही अमेरिकेत वर्क फ्रॉम होम सुरूच राहणार?

कोरोना उद्रेकामुळे अमेरिकेत मोठा हाहाकार माजला आहे. त्यामुळे या देशात आणि मुख्यत्वे देशाच्या राजधानीत आता अनेक जण वर्क फ्रॉम होमला महत्त्व देऊन काम करू लागले आहेत.

पण, यामुळे अनेक कंपन्यांनी आता इथून पुढेही बहुतांश कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे भविष्यात वॉशिंग्टनमधली गर्दी कमी होऊन लोक घरून काम करतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. याचा मात्र, तिथल्या रेस्टॉरंट उद्योगावर वाईट परिणाम होईल अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)