कोरोना लॉकडाऊन : चहाच्या मळ्यात काम करणारे मजूर अडचणीत- पाहा व्हीडिओ

कोरोना लॉकडाऊन : चहाच्या मळ्यात काम करणारे मजूर अडचणीत- पाहा व्हीडिओ

भारतात काम करणारी जेवढी लोकसंख्या आहे, त्यापैकी 10 लाखांहून अधिक जण चहाच्या उद्योगात काम करतात. चहाच्या मळ्यातील या मजुरांना 1840 मध्ये स्थापन झालेली आसाम कंपनी भारतातली जुनी चहा उत्पादक कंपनी आहे.

कोरोना लॉकडाऊनच्या काळात ही कंपनी 3 आठवडे बंद करण्यात आली होती. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही घडलं होतं.

आता सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून कंपनीचं काम सुरू झालं आहे. पण, तोडणीसाठी महत्त्वाचा असलेला सुरुवातीचा काळ गेला आहे. कोरोनामुळे इथल्या लोकांचं फक्त आर्थिक नुकसान झालं असं नाही. तर चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या मजुरांवरही मानसिक परिणाम झालाय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)