महाराष्ट्र लॉकडाऊन : अंगणवाडीत मिळणारी सुकडी चिमुकल्यांना का नको?

महाराष्ट्र लॉकडाऊन : अंगणवाडीत मिळणारी सुकडी चिमुकल्यांना का नको?

लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रातल्या काही अंगणवाड्यातून 6 महिने ते 3 वर्षांच्या मुलांना सुकडी वाटली. पण चिमुकली मुलं सुकडी खात नसल्याची पालकांची तक्रार आहे.

त्याऐवजी आधी प्रमाणात कच्चं धान्य मिळावं, अशी पालक मागणी करतायत. सुकडी मुलांना पचत नाही. ते उलट्या करतात. त्याला चव नाही, असं पालक सांगत आहेत. पण सुकडी हा पौष्टिक आहार असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.

गहू, सोयाबीन, तेल, साखर, शेंगदाणे आणि इतर घटकांची सुकडी बनते. पण प्रक्रिया करून मुलांपर्यंत पोहोचण्यात वेळ लागतो. ती कशी बनवायची हे आयांना माहीत नाहीये.

दरम्यान, बचतगटांना काम मिळावं म्हणून सुकडी वाटल्याचं दिसून येतंय. त्यामुळे दुर्दैवानं सुकडी मुलांऐवजी कोंबड्यांना आणि गुरांना चारली जातीये. ऐन लॉकडाऊनमध्ये मुलं पोषण आहारपासून वंचित राहत आहेत.

व्हीडिओ रिपोर्ट - गणेश पोळ, बीबीसी मराठी प्रतिनिधी.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)