चीनच्या वुहानमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक ऑगस्ट 2019 मध्येच झाला होता का?

चीनच्या वुहानमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक ऑगस्ट 2019 मध्येच झाला होता का?

कोरोना व्हायरसचा उद्रेक चीनच्या वुहान शहरात डिसेंबर २०१९ मध्ये पहिल्यांदा झाल्याचं आजवर माहिती होतं. पण एका ताज्या संशोधनातून या माहितीवर संशय उपस्थित केला जातोय.

काही सॅटलाईट इमेजेसचा अभ्यास केल्यावर हार्वर्डच्या संशोधकांना असं लक्षात आलं की वुहानमधल्या पाच रुग्णालयांबाहेर वाहनांची वर्दळ ऑगस्टपासूनच अचानक वाढली होती. याच दरम्यान ऑनलाईन ‘cough’ (खोकला) आणि ‘Diarrhoea’ (डायरिया) सर्च करण्याचं प्रमाणही वाढलं होतं. त्यामुळे कोरोनाचा पहिला उद्रेक डिसेंबरच्या बऱ्याच आधी झाला असावा, असं अभ्यासात म्हटलंय.

चीनने मात्र हे संशोधन 'हास्यास्पद’ असल्याचं सांगत ही फक्त ‘वरवरची’ माहितीच असल्याचं म्हटलंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)