कोरोना मुंबई: धारावीमध्ये कोरोनावर नियंत्रण कसं मिळालं? #सोपीगोष्ट 101

कोरोना मुंबई: धारावीमध्ये कोरोनावर नियंत्रण कसं मिळालं? #सोपीगोष्ट 101

धारावीमध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाल्याचं तुम्हाला माहीत आहे. तिथली दाट लोकसंख्या, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेचे प्रश्न या सगळ्यांमुळे धारावीतल्या कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवणं हे एक मोठं आव्हान होतं.

पण आता तिथली परिस्थिती बदललीय. मुंबईत एकीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना धारावीत मात्र त्याचा वेग मंदावलाय. धारावीतले तब्बल 50 टक्के रुग्ण आता कोरोनामुक्त झालेत. हे कसं शक्य झालं?

हॉटस्पॉट बनलेल्या धारावीत परिस्थिती नियंत्रणात आलीये का? केसेस कमी करण्यासाठी प्रशासनाने नेमकी काय पावलं उचलली? आणि धारावीवरचं संकट खरंच टळलंय का? या आणि अशा काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे पाहूया आजची सोपी गोष्टी धारावीत कोरोनाचा वेग कसा मंदावला याची...

संशोधन- मयंक भागवत

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)