कोव्हिड गेला पण, लक्षणं तशीच....
कोव्हिड गेला पण, लक्षणं तशीच....
कोव्हिड रुग्णाला ताप, तीव्र डोकेदुखी, घसा धरणं, पोटात मळमळ, चव नाहीशी होणं, श्वासावरोध यासारखा त्रास कमी अधिक प्रमाणात होतो.
साधारणपणे असं आढळून आलं आहे की औषधाला प्रतिसाद मिळाला तर रुग्ण दहा दिवसांत बरा होऊ शकतो. आणि ही लक्षणंही मग नाहीशी होतात. पण, युकेमध्ये असे रुग्ण आढळले आहेत ज्यांनी कोव्हिडवर तर मात केली. पण, त्यांच्यात कोव्हिडची लक्षणं दीर्घकाळासाठी कायम राहिली. अशा लोकांचं प्रमाण नेमकं ठाऊक नाही. पण, एका पाहणीनुसार, 20 पैकी एक रुग्ण असा असू शकतो. त्यांना कोव्हिड लाँग हॉलर्स असं म्हटलं जातंय. हा नेमका प्रकार काय आहे जाणून घेऊया या रिपोर्टमधून.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)