कोरोना पाकिस्तान: लोक डॉक्टरांना ठार मारण्याच्या धमक्या का देत आहेत?

कोरोना पाकिस्तान: लोक डॉक्टरांना ठार मारण्याच्या धमक्या का देत आहेत?

पाकिस्तानमधले डॉक्टर सांगतायत की त्यांना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून दहशतीचा तसंच धमक्यांचा सामना करावा लागतोय. अनेक लोकांना कोरोना व्हायरस खरंच अस्तित्वात आहे का, अशी शंका वाटतेय. त्यामुळे ते डॉक्टरांना दोषी धरतायत.

डॉक्टरांच्या मते अनेकजण समाजात भेदभावाला सामोरं जावं लागू नये म्हणून कोव्हिड-19ची लक्षणं लपवत आहेत. बीबीसी उर्दू प्रतिनिधी फरहाद जावेद यांनी इस्लामाबादच्या कोव्हिड अतिदक्षता विभागातील डॉक्टरांशी संवाद साधला.

हतबल झालेल्या डॉक्टरांची कहाणी सांगणारा हा बीबीसीचा खास रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)