कोरोना लस: भारतीय लस कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचणीत सहभागी झालेला तरुण

कोरोना लस: भारतीय लस कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचणीत सहभागी झालेला तरुण

कोवॅक्सिन या भारतात तयार होणाऱ्या लशीची मानवी चाचणी भारतात सुरू झाली आहे.

हरयाणात रोहतक इथंही तीन जणांवर या लशीचा पहिला प्रयोग झाला.

18 जुलैला झालेल्या या चाचणीत 30 ते 55 वयोगटातले लोक सहभागी झाले होते.

पहिल्या लशीनंतर या तिघांनाही कुठलाही त्रास जाणवला नाही, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

याच मानवी चाचणीत सहभागी झालेल्या एका व्यक्तीशी बीबीसीने संपर्क साधला.

या चाचणीत ते का सहभागी झाले आणि तिथला त्यांचा अनुभव जाणून घेतला.

आता 2 ऑगस्टला त्यांना दुसरी लस देण्यात येणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)