हिरोशिमा दिवस: जपानमध्ये का जोर धरतेय अण्वस्त्रं तयार करण्याची मागणी?
6 ऑगस्ट 1945 ला अमेरिकन वायुदलाने ‘लिटल बॉय’ हा अणुबाँब जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकला. त्यापाठोपाठ तीन दिवसांनी नागासाकी शहरावर ‘फॅट मॅन’ नावाचा बाँब टाकला.
या हल्ल्यात जवळपास दीड ते दोन लाख लोकांचा मृत्यू झाला आणि अनेकांना याचे दीर्घकालीन परिणाम सहन करावे लागले. या धक्क्याने जपानच्या मानसिकतेवर मोठा आघात केला. जपानमध्ये अण्वस्त्रविरोधी भावनेने जोर धरला, आजही ही चळवळ प्रभावशाली आहे. पण चीनच्या वाढत्या आक्रमकतेमुळे आणि उत्तर कोरियाच्या धोक्यामुळे जपानमध्ये स्वसंरक्षणासाठी अण्वस्त्रं विकसित करण्याची भावना जोर धरू लागली आहे. टोकियोहून रुपर्ट विंगफिल्ड हेज यांचा हा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)