आंध्र प्रदेश: विजयवाड्यात कोव्हिड सेंटर बनवलेल्या हॉटेलला आग

आंध्र प्रदेश: विजयवाड्यात कोव्हिड सेंटर बनवलेल्या हॉटेलला आग

आंध्र प्रदेशमधील विजयवाडा इथं कोव्हिड सेंटर म्हणून उपयोग होणाऱ्या हॉटेलला आग लागून 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

सुवर्ण पॅलेस असं या हॉटेलचं नाव आहे. कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्यासाठी खासगी हॉस्पिटल्सकडून या हॉटेलचा वापर केला जात होता.

आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं आंध्र प्रदेशच्या गृह राज्यमंत्री मेकाथोटी सुचरिता यांनी सांगितलं.

आगीची घटना घडल्याची माहिती देण्यासाठी पहाटे फोन आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कोव्हिड सेंटरमध्ये 43 लोक होते. त्यात रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)