ऐश्वर्या श्योराण: मिस इंडिया फायनलिस्टने UPSC मध्ये कसं यश मिळवलं?

ऐश्वर्या श्योराण: मिस इंडिया फायनलिस्टने UPSC मध्ये कसं यश मिळवलं?

UPSC चा निकाल लागल्यापासून मला खूप फोन आले, अनेकांनी शुभेच्छा दिल्या. मला एवढं खरंच अपेक्षित नव्हतं, असं ऐश्वर्या सांगते.

"कुणी रॅम्प टू रँक म्हणतंय, तर कुणी मॉडेल टू रोल मॉडेल म्हणतंय, पण मी तीच सर्वसामान्य मुलगी आहे, जिने मनापासून UPSC ची तयारी केली. माझ्यासाठी काहीच बदललं नाही. मात्र, इतरांना माझ्याकडून प्रेरणा मिळत असेल, तर मला आनंदच आहे," असंही ऐश्वर्या सांगते.

"UPSC सर्व क्षेत्रातील, स्तरातील लोकांसाठी आहे. पैसे असले म्हणजे तुम्ही UPSC करू शकता, असं नाही. आपली गुणवत्ता, क्षमता आहे, हे जाणून घ्या आणि त्यादृष्टीने प्रयत्न करा," असंही ऐश्वर्यानं सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करूपाकिस्तानात टोळांची होतेय किलोवर विक्री शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)