बेलारूसमध्ये एका राष्ट्राध्यक्षाविरोधात हजारो लोक एकत्र आले आहेत

बेलारूसमध्ये एका राष्ट्राध्यक्षाविरोधात हजारो लोक एकत्र आले आहेत

गेल्या आठवड्यात बेलारूसमध्ये वादग्रस्त निवडणुका पार पडल्या. त्यानंतर बेलारुसची राजधानी मिन्स्क येथे हजारो लोक आंदोलन करत आहेत. राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी पायउतार व्हावं अशी ते मागणी करत आहेत.

बेलारूसने याआधी असं कधीच पाहिलं नाही. काही दिवसांपुर्वी अशी आंदोलनं क्वचितचं घडायची. सरकार अशी आंदोलनं मोडून काढायचं. पण आता नजर जिथंपर्यंत पोचेते तिथंपर्यंत लोक रस्त्यावर दिसत आहेत. इथं बदलाचं वारं वाहतयं. पाहा बीबीसी प्रतिनिधी जोनाह फिशर यांचा बेलारुसची राजधानी मिन्स्क इथून खास रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)