थायलंडच्या राजेशाही विरोधात विद्यार्थी उतरले रस्त्यावर

थायलंडच्या राजेशाही विरोधात विद्यार्थी उतरले रस्त्यावर

राजसत्तेत बदल करण्याची हाक देत जवळपास 20 हजार आंदोलक बँकॉकच्या रस्त्यावर आले.

थायलंडच्या सरकारने कोरोना व्हायरसचा उद्रेक थोपवल्याचं चित्र दिसत असलं तरी पर्यटनावर असलेली देशातली अर्थव्यवस्था पार डळमळीत झाली आहे. तसंच अनेक पर्यटनस्थळांची लोकप्रियताही कमी होत चालली आहे.

अशा परिस्थितीत थायलंडमधील राजेशाहीला आव्हान देत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने देशाला हादरवून टाकलंय. खरंतर देशातल्या राजघराण्यांवर टिका करणं हा थायलंडमध्ये गुन्हा ठरतो आणि त्यासाठी कडक कायदेही आहेत. थायलंडच्या नव्या पिढीत नेमकं काय धुमसतंय हे बीबीसीचे प्रतिनिधी जोनाथन हेड यांनी जाणून घेतलंय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)