कोरोना: ट्रेंडी मास्क घालून रॅम्प वॉक, कोव्हिड काळातलं फॅशन स्टेटमेंट

कोरोना: ट्रेंडी मास्क घालून रॅम्प वॉक, कोव्हिड काळातलं फॅशन स्टेटमेंट

कोरोनाकाळात सतत मास्क घालणं हे कदाचित कंटाळवाणं वाटू शकतं, पण ते तितकंच गरजेच आहे. त्यामुळे नेपाळमधल्या एका बोर्डिंग स्कूलमधल्या विद्यार्थ्यांनी मास्क हेसुद्धा तुमच्या फॅशन स्टेटमेंटचा भाग बनू शकतात, हे दाखवण्याचा प्रयत्न केला.

त्यासाठी त्यांनी स्वतः डिझाइन केलेल्या मास्कचा ‘फॅशन शो’ आयोजित केला. वर्ग बंद असताना मुलांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा म्हणून शिक्षकांनीही त्यांना मदत केली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)