अमित शाह यांना कोरोना व्हायरस मधून बरं झाल्यानंतर पु्न्हा AIIMS मध्ये भरती का करण्यात आलं

अमित शाह यांना कोरोना व्हायरस मधून बरं झाल्यानंतर पु्न्हा AIIMS मध्ये भरती का करण्यात आलं

भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) मध्ये भरती करण्यात आलं आहे.

अमित शाह यांची प्रकृती बरी आहे आणि ते हॉस्पिटलमधून आपलं काम सुरू ठेवतील, अशीही माहिती डॉ. आरती विज यांनी दिली

14 ऑगस्ट रोजी त्यांनीच एक ट्वीट करून सांगितलं होतं की त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तेव्हा त्यांना गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते पुढचे काही दिवस home isolation किंवा अलगीकरणात राहणार आहेत, असं सांगण्यात आलं होतं.

मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांना थकवा आणि अंगदुखीचा त्रास होतोय. त्यामुळे त्यांना नवी दिल्लीतील AIIMS मध्ये पुन्हा भरती करण्यात आलं.

पाहा हा व्हीडिओ –

व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – राहुल रणसुभे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)