अमेरिकेत कृष्णवर्णीय नागरिक पुन्हा पोलिसी बळाचा शिकार, शेकडो लोक रस्त्यावर

अमेरिकेत कृष्णवर्णीय नागरिक पुन्हा पोलिसी बळाचा शिकार, शेकडो लोक रस्त्यावर

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड यांच्या पोलिस कस्टडीतील हत्येचं प्रकरण ताजं असतानाच विस्कॉन्सिन राज्यात असंच एक प्रकरण पुढे आलंय. आणि त्यावरून केनोसा शहरात कालपासून जोरदार निदर्शनं सुरू झाली आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधूराचा मारा करावा लागला. तर या भागात संचारबंदीही लागू झाली आहे.

ही घटना रविवार सकाळची आहे. जेकब ब्लॅक नामक एका आफ्रो-अमेरिकन व्यक्तीवर पोलिसांनी लोकांसमोर गोळ्या झाडल्या. गोळी पाठीत घुसल्यामुळे ब्लॅक सध्या रुग्णालयात आहेत. विस्कॉन्सिन राज्याचे डेमोक्रॅट गव्हर्नर टोनी एव्हर्स यांनी पोलिसांवर बळाचा अतीवापर केल्याचा आरोप केला आहे.

घडलेल्या घटनेचा आणि त्यावर उमटलेल्या पडसादावर हा रिपोर्ट...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)