कोव्हिड वॉर्डमधलं टॉयलेट या आरोग्यमंत्र्यांनी स्वत:हून साफ केलं

कोव्हिड वॉर्डमधलं टॉयलेट या आरोग्यमंत्र्यांनी स्वत:हून साफ केलं

पाँडीचेरीचे आरोग्य मंत्री मल्लाडी कृष्ण राव यांनी स्वत:हून कोव्हिड वॉर्डमधल्या टॉयलेटची सफाई केली. पाँडीचेरीमधील सरकारी हॉस्पिटल आता कोव्हिड वॉर्डमध्ये बदलण्यात आलं आहे. गेल्या महिन्यात काही कोरोना बाधित रुग्णांनी टॉयलेट्स अस्वच्छ असल्याची तक्रार केली होती.

त्यानंतर आरोग्य मंत्र्यांनी हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली. तसंच स्वत:हून स्वच्छतागृहांची पाहणी केली. टॉयलेट स्वच्छ नसल्याचं त्यांना दिसून आलं. तेव्हा त्यांनी स्वत:हून त्याची सफाई केली. त्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांशी स्वतः चर्चा केली आणि हॉस्पिटल स्वच्छ ठेवा अशा सूचना केल्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)