देशात ‘या’ 5 राज्यांत आहेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू

देशात ‘या’ 5 राज्यांत आहेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू

देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 40 लाखांच्या आसपास आहे. आणि जी आकडेवारी आतापर्यंत समोर आलीय त्यातून एक सिद्ध होतं की, रुग्णसंख्या देशाच्या काही भागात एकवटली आहे. जसं महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे आतापर्यंत आठ लाखांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे.

आता तिथला भर आधीच्या तुलनेत ओसरला असला तरी, दिल्लीतली रुग्णसंख्या वाढते आहे. जिथे लोकसंख्येची घनता जास्त आहे, किंवा दाटीवाटीने लोक राहतात अशा राज्यांमध्ये रुग्णसंख्या जास्त असल्याचं म्हणता येईल. मग आकडेवारीनुसार, भारतातली अशी पाच राज्य कुठली जिथे कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक पाहायला मिळाला?

महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू....देशातली पाच प्रमुख महानगरं याच राज्यांत आहेत. कोरोनामुळे देशभरात 66 हजारांच्या वर मृत्यू झाले आहेत. त्यातला 70 टक्के वाटाही ही राज्यं उचलतात.

त्याचबरोबर महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली आणि आंध्रप्रदेश या राज्यांचा रिकव्हरी रेटही अँक्टिव्ह केसेसच्या तुलनेत साडेतीन पट जास्त आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)