मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली, याचा नेमका अर्थ काय?

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली, याचा नेमका अर्थ काय?

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं तुर्तास स्थिगीती दिली आहे. त्यामुळे आता 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही आहे. तसंच सरकारी नोकरीमध्येसुद्धा हेआरक्षण दिलं जाणार नाही हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

वैद्यकीय शिक्षणातील आतापर्यंत झालेल्या पदव्युत्तर प्रवेशांना मात्र त्यातून वगळण्यात आलं आहे. मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. मराठा आरक्षणाची याचिका 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. 2020-21 या सत्रासाठी मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणांमध्ये आरक्षण दिलं जाणार नाही हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. पुढील निर्णय येईपर्यंत मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे.

पदव्युत्तर प्रवेशाबाबत सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे पदव्युत्तर प्रवेशाबाबत काहीही बदल केला जाणार नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितले की या प्रकरणावर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या निगराणीत खंडपीठ स्थापन करून निर्णय घेतला जाईल.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)