कविता भोंडवे: तुम्ही अपंग आहात तुम्हाला नाही हे जमणार म्हणणाऱ्यांना त्यांनी दिलं असं उत्तर

कविता भोंडवे: तुम्ही अपंग आहात तुम्हाला नाही हे जमणार म्हणणाऱ्यांना त्यांनी दिलं असं उत्तर

कविता गेल्या 9 वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातल्या दहेगाव आणि वाघूळ या दोन गावांच्या सरपंच आहेत. पण सुरुवातीला त्यांना आश्वासक वातावरण नक्कीच मिळालं नव्हतं. 'जी बाई स्वतःला सांभाळू शकत नाही, स्वतः दोन पायांवर चालू शकत नाही, ती गाव काय सांभाळणार' असं त्यांच्या तोंडावर त्यांना सुनावलं गेलं होतं.आता आपलं पद राहो किंवा जावो, राजकारणात सक्रिय असो किंवा नसो महिलांसाठी आयुष्यभर काम करण्याचं त्यांनी ठरवलं आहे. "माझं बायांना हेच सांगणं आहे की आयुष्यात सगळं मनासारखं घडतंच असं नाही. पण तुम्ही थांबू नका, बस्स पुढे जात राहा."

रिपोर्टिंग - अनघा पाठकएडिटर - निलेश भोसले

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)