कोरोनाचे उपचार सुरू असताना ट्रंप यांचा कारमधून फेरफटका
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी रविवारी स्वत: कोरोनाग्रस्त असताना रुग्णालयाबाहेर कारमधून एक फेरफटका मारला.
बाहेर जमलेल्या चाहत्यांचे आभार मानण्यासाठी हा त्यांच्या छोटेखानी दौरा होता. पण, वैद्यकीयदृष्ट्या तसं करणं सुरक्षित नाही आणि त्यांनी बरोबरच्यांचा जीवही धोक्यात घातला, अशी टीका आता अनेकांनी केली आहे.
शुक्रवारी डोनाल्ड ट्रंप आणि त्यांच्या पत्नी वॉल्टर रिड मिलिटरी मेडिकल सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल झालेत. इथल्या डॉक्टरांनी ट्रंप यांची तब्येत सुधारत असल्याचं सांगितलं आहे. आणि २४ तासांत त्यांना घरी सोडण्यात येईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. डोनाल्ड ट्रंप यांची ती कारची रपेट आणि त्यांच्यावर सुरू असलेले उपचार यांचा हा आढावा.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)