पाकिस्तानात आयुष्य घालवलेल्या आजीला जेव्हा भारतातल्या मूळ कुटुंबाचा शोध लागतो

पाकिस्तानात आयुष्य घालवलेल्या आजीला जेव्हा भारतातल्या मूळ कुटुंबाचा शोध लागतो

सन 1947ची ही गोष्ट आहे. भारताची फाळणी झाली होती. हजारो लोक एकमेकांच्या नातलगांकडून दूर गेले होते. त्यावेळी 12 वर्षांची डाफिया बाई ही हिंदू मुलगीही पाकिस्तानात हरवली होती.

एका मुस्लीम कुटुंबात ती लहानाची मोठी झाली. आता डाफिया बाईंचं वय 85 वर्षं आहे. आजही त्यांना मूळ कुटुंबाला भेटण्याची ओढ आहे. सोशल मीडियामुळे तब्बल 73 वर्षानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबाची माहितीही मिळालीय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)