अमेरिका निवडणूक: ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ चळवळीचा निवडणुकीवर परिणाम होईल का?

अमेरिका निवडणूक: ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ चळवळीचा निवडणुकीवर परिणाम होईल का?

कोरोनाचा उद्रेक एकीकडे सुरू असताना अमेरिकेत कृष्णवर्णीय इसम जॉर्ज फ्लॉईड यांचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाल्याचं प्रकरण घडलं आणि अमेरिकेत वर्णद्वेषविरोधी चळवळच उभी राहिली.

कृष्णवर्णियांना समान न्याय आणि हक्कांची मागणी करत ही चळवळ देशभर फोफावली आहे. आता काही राज्यांमध्ये आंदोलनकर्ते निवडणुकीच्या रिंगणातही उतरत आहेत.

अशावेळी ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ चळवळीचा अमेरिकन राजकारणावर नेमका काय परिणाम होतो आहे? मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यात आंदोलनकर्ते यशस्वी होतील का, याचा घेतलेला हा आढावा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)