उत्तर कोरियाने शस्त्रांचा गुप्त कारखाना उभारल्याचा एका माहितीपटातून दावा

उत्तर कोरियाने शस्त्रांचा गुप्त कारखाना उभारल्याचा एका माहितीपटातून दावा

उत्तर कोरिया करत असलेल्या अण्वस्त्र चाचण्यांमुळे संयुक्त राष्ट्रसंघ आणि खासकरून अमेरिकेनं त्यांच्यावर निर्बंध लादले आहेत. बाहेरच्या जगाशी त्यांचे व्यापारी संबंध फारसे नाहीत.

पण, हे निर्बंध झुगारून या देशातून बाहेरच्या देशामध्ये गुप्तपणे शस्त्रं विकली जात असल्याचा दावा एका माहितीपटात करण्यात आला आहे.

'द मोल' हा माहितीपट आता जागतिक स्तरावर प्रदर्शितही झाला आहे. त्याचे दिग्दर्शक मॅड्स ब्रुगर यांनी दहा वर्षं या माहितीपटावर काम केल्याचा दावा केला आहे. या माहितीपटाने जगभरात खळबळ माजली आहे. त्याविषयी या माहितीपटातले अभिनेते आणि संशोधक यांच्या मुलाखतींचा हा व्हीडिओ...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)