आर्मेनिया–अझरबैजान दरम्यान युद्धविरामानंतरही हल्ले सुरूच
आर्मेनिया आणि अझरबैजान देशांमध्ये युद्धविराम तर झाला. पण, युद्ध अजून संपलं नाही. म्हणजे असं की, दोन्ही बाजूची सैन्य एकमेकांवर हल्ल्याचा आरोप करत बाँब वर्षाव थांबवत नाहीएत. नागार्नो-काराबाख हा वादग्रस्त भाग अजूनही सैन्याने वेढलेला आहे.
अधिकृतपणे हा भाग अझरबैजानच्या ताब्यात आहे. पण, तिथे आर्मेनियन वंशाचे लोक राहतात. आणि आर्मेनियानेही या भागावर दावा केलाय. सध्या मात्र युद्धाचं दु:ख दोन्ही देश भोगतायत. आणि त्याचवेळी हक्क सोडायलाही तयार नाहीएत.
सतत बाँब वर्षावाच्या माऱ्याखाली असलेल्या स्टेपनकर्ट शहरातून बीबीसी प्रतिनिधी स्टिव्ह रोझनबर्ग यांचा रिपोर्ट...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)