मासिक पाळी: PCOD म्हणजे नक्की काय?

मासिक पाळी: PCOD म्हणजे नक्की काय?

PCOD किंवा PCOS ही एकाच आजाराची दोन नावं आहेत. हा मासिक पाळीशी संबधित आजार आहे हे आपण अनेकदा ऐकलेलं असतं. पण नक्की हा आजार काय आहे, हा कशामुळे होतो आणि याची लक्षण काय याबदद्ल फारशी माहिती नसते.

PCOD वंध्यत्व देणारा आजार नाही. हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे तो होतो. PCOD असणाऱ्यांपैकी 40 ते 50% स्त्रियांमध्ये वजन वाढतं. अँड्रोजेन नावाचं एक मेल हॉर्मोन असतं.

PCOD मध्ये या अँडोजेनची पातळी वाढते. त्यामुळे अंडाशयातून परिपक्व स्त्रीबीज बाहेर पडण्यात अडथळा येतो आणि मासिक पाळीही वेळेवर येत नाही. फक्त 5% वजन कमी केल्याने स्त्रीबीज सहजपणे बाहेर येतं आणि गर्भधारणा होऊ शकते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)