मोठ्या फॅशन ब्रँड्सच्या कारखान्यात महिला कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक

मोठ्या फॅशन ब्रँड्सच्या कारखान्यात महिला कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक

या महिलांनी शिवलेले कपडे घालून मॉडेल रॅम्पवर कॅटवॉक करतात. पण, स्वत: या कामगार महिला मात्र दारिद्र्यात खितपत पडल्या आहेत.

कारखान्यात कामाच्या जागी त्यांची पिळवणूक होतेय. जास्तीचे कामाचे तास. पण, मिळणारा मोबदला कमीच. आणि कामाच्या जागी अगदी पिण्याचं पाणी आणि स्वच्छतागृहाचीही सोय नाही.

राल्फ लॉरेन, मार्क्स अँड स्पेन्सर्स आणि टेस्को या जागतिक ब्रँडसाठी तयार कपडे बनवणाऱ्या भारतीय कारखान्यांमध्ये महिला शिलाई कामगारांची ही अवस्था आहे.

बीबीसीच्या प्रतिनिधी रजनी वैद्यनाथन यांनी ही परिस्थिती समोर आणल्यावर तीनही कंपन्यांनी आपण या आरोपांची दखल घेऊ असं म्हटलं आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)