कोरोना लस: युकेतील सर्वांत मोठ्या लसीकरण मोहिमेला आजपासून सुरुवात

कोरोना लस: युकेतील सर्वांत मोठ्या लसीकरण मोहिमेला आजपासून सुरुवात

युकेमध्ये 90 वर्षांच्या आजी मार्गारेट कीनन कोरोनाची लस घेणाऱ्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत. फायझर लशीच्या वापराला युके सरकारने आपत्कालीन मंजुरी दिल्यानंतर तिथे मोठ्या लसीकरण मोहिमेला आजपासून सुरुवात झाली.

पहिल्या टप्प्यात वयोवृद्ध आणि इतर आजार असलेल्या तसंच आरोग्यसेवकांना ही लस देण्यात येणार आहे. लसीच्या वापरानंतर कोरोनामुळे थांबलेलं आयुष्य पूर्ववत होईल अशी आशा सगळ्यांनाच आहे.

पण, त्यासाठी काही महिने लागतील असा सावध पवित्रा आरोग्य तज्ज्ञांनी घेतलाय. बीबीसीचा खास रिपोर्ट...

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)