मोदी सरकार शेती कायदे मागे घ्यायला तयार का नाही?

मोदी सरकार शेती कायदे मागे घ्यायला तयार का नाही?

मोदी सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर सलग दोन आठवडे आंदोलन सुरू आहे. सरकारने काही महत्त्वाच्या तरतुदींमध्ये दुरुस्ती करण्याची तयारी दर्शवली आहे, पण सरकार हे कायदे रद्द करेपर्यंत आम्ही हटणार नाही या भूमिकेवर आंदोलक ठाम आहेत.

शेतकऱ्यांची काळजी असेल तर सरकारने कायदे रद्द करावेत असं आंदोलनाचे समर्थक म्हणतात तर या सुधारणांना पाठिंबा देणारे लोक आंदोलकांच्या भूमिकेला हट्टी म्हणतात. सरकार नमतं घेणार नाहीच का? मोदी सरकारसाठी हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे? आजची ही सोपी गोष्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)