महाराष्ट्रातल्या गोड ऊसाची कडू कहाणी तुम्ही पाहिलीय का?

महाराष्ट्रातल्या गोड ऊसाची कडू कहाणी तुम्ही पाहिलीय का?

दरवर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात आपण दिवाळीची तयारी करत असतो. तेव्हा मराठवाडा आणि विदर्भातली काही गावे ओस पडू लागतात.

कारण घरतली कर्ती-धर्ती माणसं पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडायला निघालेली असतात. पोटातली आग विझावी आणि चुलीतली आग पेटावी म्हणून पहाटे कडाक्याच्या थंडीत हे लोक उठतात, दिवसभराचा स्वयंपाक करतात. हातात कोयता आणि भाकरी घेऊन ऊस तोडायला निघतात.

पण त्यांना हे सगळं का करावं लागतंय? पश्चिम महाराष्ट्र समृद्ध होण्यामागे ऊसाच्या शेतीचा मोठा हातआहे. पण त्यासाठी ऊसतोड कामगारांना मोठी किंमत मोजावी लागतेय.

ऊसतोड कामगारांची स्थिती जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने सोलापूर, बारामती, पुणे, सातारा, सांगली या भागाचा दौरा केला.

व्हीडिओ रिपोर्ट - गणेश पोळ, बीबीसी मराठी प्रतिनिधी

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)